Posts

Showing posts from December, 2022

एकतर्फी

एकतर्फी निरागस प्रेमाच्या आठवणी आयुष्य भर माणसाला तजेलदार ठेवत असतील, त्या त़शाच ठेवुन त्यांच्या आठवणीत, वेडसरपणा म्हणा नेहमी खुष ठेवतो,  असल्या प्रेमात ब्रेकअप किंवा टोकाचीभांडणे नसतील, त्यामुळे आठवणी सुखद असतील,  असे प्रेम कधी ऊघड होऊ नये, त्यातली मजा निघुन जाईल,  एकतर्फी प्रेमाची पुसटसा अंदाज दुसर्याला येत असेल का?  कदाचीत हो, पण ज्याचे प्रेम आहे त्याला ही कल्पना नसेल तो त्याच्या च धुंदीत असेल,  म्हातारपणी किंवा आयुष्य च्या ऊतरत्या काळात जेव्हा हे दोघे समोरासमोर भेटत असतील तेव्हा त्यांना लहान झाल्या सारखे वाटत असेल

निरोप

आकाशात पाहशील तेव्हा मी तुला तारेमध्ये दिसेन. लुक लुक करून बोलावण्याचा तुला तो इशारा असेल. समुद्र कडे पाहशील तेव्हा मी तुला लाटांमध्ये दिसेन. उसळली मारून तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न असेल. पुस्तकात पाहशील तेव्हा मी तुला अक्षरा अक्षरात दिसेन. माझ्याच जीवनाची कहाणी करून शब्दा शब्दांत सांगणे. नयनी स्वप्न पाहशील तेव्हा हि मीच दिसेन. मला भेटायला धावशील त्यावेळी मी या जगाचा निरोप घेतलेला असेल .

आत्मविश्वास

 खुप वर्षांनी पुन्हा तो आयुष्यात डोकावला माझ्यावीना आयुष्य कसं वाटलं? कानाशी पुटपूटला, छानच की...... मी म्हटलं😊 संसाराच्या गाड्यात सहाजिकच  तुझं विस्मरण झालं अस्तित्वावर बोट ठेवायला पुन्हा का येणं केलंस? रोजच्या धावपळीत स्वतःलाच  विसरले होते संघर्ष कुठंच नव्हता म्हणून  हळूवार तुझे बोट सोडले होते शाळाकॉलेजमध्ये तू सोबत होतास म्हणून  अशक्य ते शक्य झालं मेहनतीने का असेना, यशाचं शिखर गाठता आलं आता संसारात मुलांसाठी  मन मारावं लागतं एवढ करुनही आईला काही येत नाही  असं त्यांना वाटतं दोन पुस्तक शिकून  मुलं गर्व करूं लागतात पहिला गुरु आई  हेच नेमकं विसरतात नवऱ्याच्या पाठीशी बायको खंभीर उभी रहाते पण प्रशंसा सोडून, 'वेंधळीच आहेस बघ'   हेच ऐकायची सवय होते तू होतास तेव्हां आयुष्य होतं छान सुधारीत जगात जगताना  नवरा, मुलांशिवाय हलत नाही पान मी मात्र मागे राहिले  स्वतःसाठीचं जगायच विसरले मित्रा आता तरी घे हातात हात आजन्म दे तूच आता साथ तो म्हणाला, मला मिळवण्यासाठी कणखर व्हावं लागतं नवा दिवस उजाडावा तर पृथ्वीलाच  सूर्याभोवती फिरावं ल...