एकतर्फी

एकतर्फी निरागस प्रेमाच्या आठवणी आयुष्य भर माणसाला तजेलदार ठेवत असतील, त्या त़शाच ठेवुन त्यांच्या आठवणीत, वेडसरपणा म्हणा नेहमी खुष ठेवतो, 
असल्या प्रेमात ब्रेकअप किंवा टोकाचीभांडणे नसतील, त्यामुळे आठवणी सुखद असतील, 
असे प्रेम कधी ऊघड होऊ नये, त्यातली मजा निघुन जाईल, 
एकतर्फी प्रेमाची पुसटसा अंदाज दुसर्याला येत असेल का? 
कदाचीत हो, पण ज्याचे प्रेम आहे त्याला ही कल्पना नसेल तो त्याच्या च धुंदीत असेल, 
म्हातारपणी किंवा आयुष्य च्या ऊतरत्या काळात जेव्हा हे दोघे समोरासमोर भेटत असतील तेव्हा त्यांना लहान झाल्या सारखे वाटत असेल

Comments

Popular posts from this blog

चित्रपट बनविण्यापूर्वी - ओळख सोळा मूलभूत घटकांची

आत्मविश्वास