निरोप

आकाशात पाहशील तेव्हा मी तुला तारेमध्ये दिसेन.
लुक लुक करून बोलावण्याचा तुला तो इशारा असेल.
समुद्र कडे पाहशील तेव्हा मी तुला लाटांमध्ये दिसेन. उसळली मारून तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न असेल.
पुस्तकात पाहशील तेव्हा मी तुला अक्षरा अक्षरात दिसेन.
माझ्याच जीवनाची कहाणी करून शब्दा शब्दांत सांगणे.
नयनी स्वप्न पाहशील तेव्हा हि मीच दिसेन.
मला भेटायला धावशील त्यावेळी मी या जगाचा निरोप घेतलेला असेल .

Comments

Popular posts from this blog

चित्रपट बनविण्यापूर्वी - ओळख सोळा मूलभूत घटकांची

आत्मविश्वास

एकतर्फी